Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

पुणेकरांनो सावध!खडकवासल्यातून पाणी सोडण्याचा वेग वाढला, प्रशासनाचा अलर्ट! रात्रीपासून पावसाचा जोर कायम!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर व जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रमुख धरणे भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे ९००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक भागांत मुसळधार पाऊस आहे. IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी शाळा-महाविद्यालये बंद. विदर्भ, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

सकाळपासून पुण्यातील मध्यवर्ती भाग, उपनगरांसह परिसरात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. घाटमाथ्यावर आणि डोंगराळ भागात पावसाची दमदार हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. १२ टीएमसी क्षमतेचे हे धरण १०० टक्के भरल्याने पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी उपलब्धतेबरोबरच शेतीसाठी उपयुक्तता वाढली आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पाऊस

खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पाऊस सुरू असल्याने धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे सकाळी ९ वाजता ५७८३ क्युसेक्सवरून विसर्ग वाढवून ७९२५ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, कमी दर्जाच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आला आहे.

निरा देवघर धरण भरले

पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर सतत पडणाऱ्या पावसामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण भरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या धरणामुळे खालच्या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. सोलापूरसह साताऱ्यातील शेतकऱ्यांना पाण्याची चिंता कमी झाली आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष

दरम्यान, पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग सतर्क मोडमध्ये आहे. रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठ, नाल्याकाठ आणि कमी उंचीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीची शक्यता

हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे व परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. घाट विभागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांसाठी ही पावसाची सरसकट चांगली बातमी असली तरी शहरातील पूर आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!