Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

लोहगाव-खराडीमध्ये महापालिकेची धडक कारवाई; २१,४०० चौ. फूट अनधिकृत आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे प्रतिनिधी  : पुणे महानगरपालिकेने बेकायदा बांधकामांवरील कारवाईची मोहीम पुन्हा तीव्र केली असून, मंगळवारी (ता. २८) लोहगाव आणि खराडी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने केलेल्या या कारवाईत सुमारे २१ हजार ४०० चौरस फूट आरसीसी बांधकाम जमीनदोस्त केले.

महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. लोहगाव येथील निंबाळकरनगर सर्व्हे क्रमांक २९४ आणि खराडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर सकाळी नऊपासूनच कारवाई सुरू झाली. महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये बेकायदा प्लॉटिंग आणि बांधकामांचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून परवानगी न घेता रात्रीच्या वेळी बांधकामे करत असल्याचे समोर आले आहे.

बनकर म्हणाले, मंगळवारच्या कारवाईसाठी दोन पोलिस अधिकारी, १३ पोलिस कर्मचारी, ३५ एमएसएफ जवान, पाच जेसीबी, सहा गॅस कटर, सात ब्रेकर आणि २५ बिगारी सेवकांचा ताफा तैनात होता. विकास आराखडा (डीपी) मंजूर होईपर्यंत नागरिकांनी बेकायदा प्लॉटिंगमध्ये भूखंड खरेदी करू नयेत आणि अनधिकृत बांधकामे टाळावीत. सामान्य नागरिकांना अनधिकृत इमारतींमध्ये घर खरेदी करू नये, त्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे घऱ घेताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून पाहावीत असे आव्हान करण्यात आले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!