Uncategorized

भूम पोलिसांचा धडक सर्जिकल स्ट्राईक : सह्याद्री हॉटेलमधील गांजा आणि दारूचा अड्डा उध्वस्त!

पुणे | दिपसागर न्यूज नेटवर्क:

भूम तालुका (प्रतिनिधी) : भूम परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर आणि अंमली पदार्थांच्या काळ्या बाजारावर भूम पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करत कारवाईचा बडगा उगारला आहे. पाथरुड ते पाटसांगवी मार्गावरील ‘हॉटेल सह्याद्री’च्या आडून सुरू असलेला काळा धंदा पोलिसांनी उघडकीस आणला असून, हजारो रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत.

भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ सप्टेंबर २०२६ रोजी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. पाथरुड-पाटसांगवी रस्त्यावरील ‘हॉटेल सह्याद्री’ येथे विनापरवाना अंमली पदार्थ आणि दारूचा साठा करून त्याची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर अचानक धाड टाकली.

या अचानक झालेल्या कारवाईने हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी अरुण गोवर्धन जाधव (वय २७, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांच्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :

१. अंमली पदार्थ : २४१ ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत १२,०५० रुपये).

२. अवैध मद्यसाठा : देशी दारूच्या १८० मिलीच्या १३६ बाटल्या आणि ट्युबॉर्ग स्ट्रॉंग बिअरच्या ६५० मिलीच्या ४ बाटल्या.

३. एकूण मुद्देमाल : गांजा आणि मद्यसाठा मिळून एकूण २३,७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८७/२०२६ अन्वये कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच कलम ८(क), २०(ब) NDPS Act प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या रॅकेटची पाळेमुळे शोधत आहेत.

खाकीचा दणका आणि तपासाची चक्रे :

ही कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर कारवाई परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते, सपोनि खांडे, पोलीस अंमलदार HC १५४७ कवडे, PC ५०३ कवडे, PC १६१४ जाधव, PC ७१६ चेडे, PC १०४८ नाईकवाडी, HC ५६४ किवंडे व HC ५३७ मोटे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भूम तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!