कोंढवा बु टिळेकर नगर: द्वारिका धाम टॉवर-5 मध्ये परिवर्तनाची लाट; परिवर्तन पॅनल’चा शिट्टी वाजून घरोघरी प्रचार, जास्तीत जास्त मतदान करण्याचे केले आवाहन

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
कोंढवा बु, (प्रतिनिधी) -द्वारिका धाम सोसायटी (टॉवर-5) व्यवस्थापन समिती निवडणूक सन 2026-27 ते 2031-32 ची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झाली असून, या निवडणुकीत द्वारिका परिवर्तन पॅनल’ ने प्रचारात आघाडी घेतली आहे. पॅनलच्या वतीने रविवारी सोसायटीतील प्रत्येक सभासदांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत निवडणूक प्रक्रिया समजावून सांगत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
सोसायटीमध्ये जवळपास एक वर्षापूर्वी हंगामी कमिटी स्थापन करून सर्व कारभार त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता. लिफ्ट, व्हिजिटर पार्किंग यांसारखे महत्त्वाचे विषय हातात असतानाही, बिल्डरचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपायच्या अगोदर यावर ठोस असे काहीच उपयोजना केली गेले नाही. बिल्डरला केवळ नोटीस पाठवण्यापलीकडे कोणतीही कारवाई झाली नाही. लिफ्ट निकृष्ट दर्जाची असून रोजच त्याचा खेळखंडोबा सुरू असतो, रोज लिफ्ट बंद पडते, अनेक सभासद त्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही. व्हिजिटर पार्किंगचा प्रश्न आजही जैसे थेच आहे. झालेल्या खर्चांचा कोणताही हिशोब सभासदांसमोर आला नाही. सत्ता हातात असताना देखील बिल्डर विरोधात महारेरा कोर्टात केस दाखल करण्यापर्यंत मजल गाठता आली नाही, ती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवाराने निर्भीडपणे सर्व सभासदांच्या हक्कासाठी महारेरा कोर्टात केस दाखल करून धाडस दाखवले आहे. आता निवडणुकीत व्हॉट्सॲपवर आणि प्रत्यक्षात सभासदांना भेटून आम्ही ‘हे करू, ते करू, असं करू, तसं करू’ अशी केवळ पोकळ आश्वासन पाहायला मिळत आहेत, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि वास्तवात काहीच नाही, अशी सभासदांमध्ये चर्चा आहे.
सोसायटीच्या गेल्या दोन वर्षांच्या कारभारात मूलभूत सुविधांचा अभाव, लिफ्टचा वारंवार बिघाड, पार्किंग बेशिस्त, लिकेज, अपुरी साफसफाई, बिल्डरकडून अनेक प्रकारचे अपूर्ण कामे आणि सभासदांना विश्वासात न घेता होणारा अपारदर्शक मनमानी कारभार या विरोधात सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 11 सुशिक्षित, पदवीधर सभासद एकत्र येऊन द्वारिका परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या पॅनलने केवळ आश्वासने न देता कृतीतून काम करून दाखवले आहे. सोसायटीच्या मूलभूत हक्कांसाठी – लिफ्ट, विज, पार्किंग, आणि बिल्डरने पोझिशन मिळण्यापूर्वी 6 महिन्यांचा पीएमसी मध्ये लावलेला टॅक्स, तसेच फ्लॅट मधील लिकेज यांसारख्या प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या कामांसाठी आणि सोसायटीतील सर्व सभासदांच्या हितासाठी बिल्डर विरोधात _महारेरा (MahaRERA) न्यायालयात केस दाखल_ केली आहे. हा लढा जिंकून सभासदांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची हमी पॅनलने दिली आहे.
पॅनल प्रमुख विजय गायकवाड (फ्लॅट नं. 1107) यांच्या नेतृत्वाखाली_ या घरोघरी प्रचार मोहिमेत सर्वसाधारण गटातील उमेदवार नंदकुमार गायकवाड, बन्सीलाल गोरे, अमित पवार, हरीश माने, सारंग दानवे, लक्ष्मण माने, शुभम विद्यागज, संतोष निंबाळकर, तसेच महिला राखीव गटातील उमेदवार रतन धिमधिमे आणि ओबीसी गटातील सक्षम उमेदवार नीलकंठ बेनाडे यांनी सहभाग घेतला.
यावेळी सभासदांशी संवाद साधताना पॅनल प्रमुख विजय गायकवाड म्हणाले, “आमचा लढा कोणत्याही व्यक्ती विरोधात नसून, गैरकारभाराविरोधात आहे. सोसायटी असो किंवा कमिटी कोणाचीही असो, कायद्याने आणि नियमाप्रमाणे काम झाले नाही तर त्याविरोधात लढणारे आणि पर्दाफाश करणारे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही काम करणार आहोत. सोसायटीत पारदर्शकता, प्रत्येक रुपयाचा हिशोब आणि प्रत्येक सभासदाचा सन्मान हेच आमचे ध्येय आहे.”
सोसायटीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध विकासासाठी सर्व सभासदांनी 11 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या मतदानात ‘शिट्टी’ या निशाणीसमोर शिक्का मारून द्वारिका परिवर्तन पॅनलच्या 11 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे,_ असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मतदान – रविवार दि. 11 ऑक्टोबर 2026, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, ठिकाण – द्वारका धाम सोसायटी पार्किंग प्रांगण.




