बारामती– भिगवण रोडवर देहव्यापाराचा सुळसुळाट! लॉज चालकांची मनमानी; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न!
परप्रांतीय महिलांच्या शोषणाच्या तक्रारी; बांगलादेशी मुलींबाबतही गंभीर आरोप

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा;
प्रतिनिधी- बारामती–भिगवण रोड परिसरातील लॉजमध्ये कथित बेकायदेशीर देहव्यापार राजरोजपणे बेकायदेशीर रित्या सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. शिवकन्या, प्रणव, निसर्ग, सोमनाथ आणि ब्रँड हॉटेल अँड लॉजिंग या लॉजच्या नावांची चर्चा होत असून, या परिसरात नेमके काय सुरू आहे, याची चौकशी करून या सर्व लॉजवरती कडक कायदेशीर कारवाई करून लॉज चालकावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे .
लॉज चालकांची मनमानी; जबरदस्तीने बांगलादेशी व अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो
परप्रांतीय महिलांना आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने देहव्यापारात ढकलले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. काही या लॉज मध्ये बांगलादेशी मुलींचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. हा केवळ अवैध व्यवसायाचा विषय नसून महिलांच्या सुरक्षिततेचा आणि संभाव्य मानवी तस्करीचा गंभीर प्रश्न आहे.
या कथित व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित लॉजची तपासणी आणि तक्रारींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
स्थानिक पोलीस स्टेशनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
या परिसरातील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या कार्यक्षेत्रात अशा तक्रारी येत असताना संबंधित लॉजवर कोणती कारवाई झाली, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
पोलिसांना हप्ते दिले जात असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत. या आरोपांची वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. गैरप्रकारात कोणाचाही सहभाग सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी!
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी या बातमीची दखल घेऊन संबंधित लॉजवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
दिपसागर न्यूजचा थेट सवाल!
लॉजमधील कथित गैरप्रकारांना आळा कधी बसणार? महिलांच्या शोषणाच्या तक्रारींची चौकशी कधी होणार? हप्त्यांच्या आरोपांमागील सत्य जनतेसमोर कधी येणार?
महिलांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. संबंधित लॉजची निष्पक्ष तपासणी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
दिपसागर न्यूज | जनहितासाठी निर्भीड वार्तांकन




