बारामती–भिगवण रोडवरील लॉजमध्ये वेश्याव्यवसायाचा खुलेआम धंदा? परप्रांतीय महिलांसह अल्पवयीन मुलींकडून करून घेतला जातो वेश्याव्यवसाय स्थानिक पोलिसांची ‘हातावर घडी, तोंडावर बोट’ भूमिका!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
बारामती | दिपसागर न्यूज नेटवर्क
बारामती प्रतिनिधी:- बारामती–भिगवण रोडवरील शिवकन्या लॉज, निसर्ग लॉज, प्रणव लॉज, सोमनाथ लॉज तसेच ब्रँड हॉटेल अँड लॉजिंग यांसह परिसरातील काही लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. परप्रांतीय तसेच बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने राजरोसपणे स्थानिक पोलीस स्टेशनच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालू असल्याचे निदर्शनात आले आहे
या प्रकाराबाबत यापूर्वीही आवाज उठविण्यात आला असून, संबंधित पोलीस यंत्रणांकडे फोन द्वारे अनेक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याआहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई दिसून येत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे महिलांच्या सुरक्षेच्या आणि अल्पवयीन मुलींच्या संरक्षणाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे अशा गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे? संबंधित लॉजची तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची जबाबदारी कोणाची?
तक्रारी करूनही कारवाई नाही, ही नेमकी कोणाची मेहेरबानी?
या संपूर्ण प्रकरणात स्थानिक तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची हातावर घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका असल्याचे चित्र निर्माण होत आहे. पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून स्वतंत्र पथकामार्फत तपासणी करावी, बांगलादेशी नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करावी, तसेच अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा कोणताही प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार का? की तक्रारींच्या फाईलींवरच हे गंभीर प्रकरण दडपले जाणार?
|| दिपसागर न्यूज ||




