द्वारिका धाम टॉवर टी-५ चे ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सभासदांकडून शुभेच्छांचा वर्षाव

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
कोंढवा टिळेकर नगर: द्वारिका धाम सोसायटी, टॉवर टी-५ मधील ज्येष्ठ सभासद मा. नंदकुमार गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शांत, संयमी व मनमिळावू स्वभाव, विविध विषयांचा सखोल अभ्यास, सोसायटीच्या हिताच्या प्रश्नांबाबत सातत्याने जागरूक राहून विधायक भूमिका मांडणे तसेच सभासदांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणे, या गुणांमुळे त्यांनी सोसायटीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्य व न्यायाच्या भूमिकेला प्राधान्य देत सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सभासदांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना आहे.
यावेळी सोसायटीतील प्रतिष्ठित सभासद हरीश माने, देवेंद्र मोरे अमित पवार, बंसी गोरे, विजयसिंह गायकवाड, सारंग दानवे संतोष निंबाळकर तसेच पाटील साहेब गोरखनाथ पन्हाळे, बापू विद्यागज, इतर अनेक सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.
संतोष निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “नंदकुमार गायकवाड हे अत्यंत अभ्यासू, शांत, दिलदार आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी नेहमी मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला योग्य दिशा दिली आहे. प्रत्येक कठीण प्रसंगी ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ आम्हा सर्वांना होत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभला आहे
यानंतर देवेंद्र मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “नंदकुमार गायकवाड हे आमच्यासाठी केवळ ज्येष्ठ सभासद नसून मोठ्या भावाप्रमाणे कायम मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. सोसायटीतील कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास ते शांतपणे योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या अनुभवाचा लाभ आम्हा सर्वांना होत असतो. त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा आणि आपुलकी आमच्यासाठी नेहमीच मोलाची राहिली आहे.”
सोसायटीतील प्रत्येक सभासदाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, कोणतीही समस्या निर्माण झाल्यास सर्वप्रथम मदतीसाठी धावून जाणारे आणि सभासदांना एकत्र ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे देवेंद्र मोरे यांच्या या भावना उपस्थितांनाही भावल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी नंदकुमार गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले. सभासदांनी व्यक्त केलेल्या प्रेम, विश्वास आणि स्नेहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, द्वारका धाम सोसायटीतील सर्वांनी एकोप्याने राहून सोसायटीच्या विकासासाठी सामूहिकपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
— दिपसागर न्यूज
“सत्याची बाजू… समाजाच्या हितासाठी!”




