Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

पिकअपने उडवून नंतर धारदार शस्त्राने वार; दुहेरी खुनाचा बदला घेतल्याची शक्यता

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

प्रतिनिधी | पाटस
दौंड तालुक्यातील पाटस येथे खुनाच्या घटनेनंतर बदला घेण्यासाठी पुन्हा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महेश (उर्फ मन्या) संजय भागवत (वय २९, रा. पाटस, ता. दौंड) याचा निर्घृण खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २०) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास महेश भागवत हा आपल्या साथीदारासह दुचाकीवरून पाटसच्या दिशेने जात होता. मुकादमवाडी उड्डाणपुलावर पोहोचताच पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही खाली कोसळले. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने महेश भागवतवर सपासप वार करून त्याचा जागीच निर्घृण खून केला.
या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी म्हणून
आनंद माखर
विकी शितकल
संतोष शितकल (रा. अंबिका नगर)
यांची नावे समोर आली असून, याआधी झालेल्या एका खुनाच्या पार्श्वभूमीवर हा खून ‘बदल्यासाठीचा खून’ असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार जलदगतीने करत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कायद्याने गुन्ह्याला गुन्ह्याने उत्तर देणे हा मार्ग नसून अशा घटनांमुळे गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडतो. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!