Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

लोहिया नगरमध्ये लोकहित युवा एकता संघटनेचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे शहर (प्रतिनिधी) : लोकहित युवा एकता संघटनेच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते कनव वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोहिया नगर परिसरातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या मार्गावर असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग, लेखन साहित्य आदी आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकहित युवा एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साजिद शेख यांनी सांगितले की, “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संघटना यापुढेही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविणार आहे.”
कार्यक्रमावेळी अहमद काझी, अविनाश अवघडे, कनव वसंतराव चव्हाण, युवा मंचचे अध्यक्ष कुणाल करोते, सिद्धांत सारवान, सिद्धार्थ भालेराव, सतीश आल्हाट, निखिल बत्तेलू, गोपी कसोटे, अक्षय वाघेला, अभिजित कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे लोहिया नगर परिसरातील पालक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून लोकहित युवा एकता संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संघटनेचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!