Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज, १३०६ पिस्तुले जमा

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी )     पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून ६ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात १,३०६ पिस्तुले जमा करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या (गुरुवारी) होणारे मतदान आणि शुक्रवारी होणारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. सह पोलीस आयुक्त, दोन अपर पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, विविध पथकांच्या कंपन्यांसह ६ हजार ९१ पोलीस सज्ज असणार आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ५० उपद्रवींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुंडगिरी प्रवृत्तीच्या ४३८ जणांना शहराच्या हद्दीबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक अनुषंगाने परवानाधारकांची एकूण १ हजार ३०६ पिस्तुले जमा केली आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त, सह आयुक्त, दोन अपर पोलीस आयुक्त यांच्यासह ६ हजार ९१ पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. पोलिसांची विशेष पथकेही शहरात गस्तीवर असणार आहेत. गर्दी होणार्‍या किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणार्‍या केंद्रांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे.महापालिका निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहेत. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४२० इमारतींमध्ये २ हजार १३५ मतदान केंद्र आहेत.

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण ३४ तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याकरीता ६८ पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. आजपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीत दैनंदीन तपासणी दरम्यान एकूण १६ लाख १७ हजाराची रोकड जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे. निवडणूक अनुषंगाने परवानाधारकांची एकूण १ हजार ३०६ पिस्तुले जमा केली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!