कोंढव्यातील The Basil Deck रूफटॉप हॉटेलवर महापालिका अधिकाऱ्यांची मेहरबानी? लेखी तक्रारी, फोनद्वारे पाठपुरावा करूनही कारवाई का नाही?
दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
कोंढवा बुद्रुक | कोंढवा परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डनसमोर, VIT कॉलेज रोडवरील The Basil Deck या रूफटॉप हॉटेलच्या कथित अनधिकृत बांधकाम आणि व्यवसायाबाबत यापूर्वी दिपसागर न्यूजने बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, नागरिकांकडून लेखी स्वरूपात तक्रारी करून, पत्रव्यवहार तसेच फोनद्वारे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही The Basil Deck हॉटेलवर कारवाई का होत नाही? संबंधित हॉटेलला रूफटॉपवर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याचे शेड मारण्याची परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक परवानग्या आहेत का? याची तपासणी करण्यात आली आहे का?
तक्रारी प्राप्त होऊनही बांधकाम विकास विभाग झोन -२ उपअभियंता वीरेंद्र टिळेकर तसेच सिद्धाराम पाटील या जबाबदार अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसेल, तर हॉटेल व्यवस्थापनाला नेमका कोणाचा पाठिंबा आहे? महापालिकेचे संबंधित अधिकारी हॉटेल व्यवस्थापनाला पाठीशी घालत आहेत का? अधिकारी आणि हॉटेल व्यवस्थापनामध्ये काही संगनमत आहे का? असे गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या आरोपांची सत्यता तपासून प्रशासनाने खुलासा करणे आवश्यक आहे.
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालणार का?
संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रत्यक्ष स्थळपाहणी, इमारतीच्या टेरेसवर पत्र्याचे शेड मारण्याची परवानग्या, अग्निसुरक्षा नियम आणि व्यावसायिक परवानग्यांची तपासणी करण्यात यावी. तसेच नागरिकांनी केलेल्या लेखी तक्रारींवर आजपर्यंत काय कार्यवाही झाली, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
दिपसागर न्यूजचा प्रशासनाला थेट सवाल — नागरिकांनी लेखी तक्रारी करायच्या, फोनद्वारे पाठपुरावा करायचा,हॉटेलवर तरीही The Basil Deck हॉटेलवर कारवाई होणार नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे?
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची बाजूही जाणून घेणे आवश्यक आहे.
दिपसागर न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार!




