Uncategorized

कोंढव्यात पुणे म.न पा.च्या अधिकाऱ्यांच्या अभयामुळे अनधिकृत ‘रुपटॉप हॉटेल’ पुन्हा सुरू; कारवाई नावापुरतीच की संगनमताचा खेळ?

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

कोंढवा : (प्रतिनिधी) – पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डन जवळ,शांतीनगर सोसायटीच्या पाठीमागच्या गेटच्या समोर व्हीआयटी (VIT) कॉलेज रोडवर पुन्हा एकदा बेकायदेशीर ‘रुपटॉप हॉटेल’चा गोरखधंदा सुरू झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्याभरापूर्वी याच हॉटेलवर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. असे असतानाही, हॉटेल मालकाने कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीर  शेड उभारत राजरोजपणे हॉटेल सुरू केले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गरिबांच्या हातगाड्यांवर कारवाई, मग अनाधिकृत बेकायदेशीर बांधकामांना अन् रूप टॉप हॉटेलांवर मूकसंमती का?

पुणे महानगरपालिकेचे अधिकारी गरिबांच्या वडापावच्या गाड्यांवर तसेच भाजीच्या गाड्या आणि हातगाड्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारतात, मग या मोठ्या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करताना प्रशासनाचे डोळे का झाकले जातात? असा सवाल नागरिक विचारत आहेत. कोणत्याही प्रकारची महापालिकेची कायदेशीर परवानगी नसताना, धोकादायक पद्धतीने शेड उभारून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. यामागे नेमका कुणाचा वरदहस्त आहे, हे उघडकीस येणे गरजेचे असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

उपअभियंता विरेंद्र टिळेकर आणि  सिद्धाराम पाटील यांच्या भूमिकेवर संशय

या अनधिकृत प्रकाराबाबत बांधकाम विकास विभाग, झोन २ चे उपअभियंता वीरेंद्र टिळेकर आणि सिद्धाराम पाटील  यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांच्याकडून कारवाई करण्यास जाणीपूर्वक विलंब केला जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन परिवर्तन सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सागरभाऊ लोंढे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या कथित दुर्लक्षपणामुळे अशा बेकायदेशीर हॉटेल मालकाची मनमानी वाढत असून, ते नियमांना धाब्यावर बसवून ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत.

सागरभाऊ लोंढे यांची आक्रमक मागणी मागणी: तातडीने गुन्हे दाखल करा!

कोंढवा परिसरात सध्या अशा बेकायदेशीर बांधकामांचा आणि हॉटेलांचा सुळसुळाट चालू असून, स्थानिक राजकीय नेत्यांचे आशीर्वाद आणि महापालिका अधिकाऱ्यांची छुपी साठगाठ यामुळेच ही अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत।

या गंभीर प्रकरणाची पुणे महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तांनी तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकावर तातडीने कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी रिपब्लिकन परिवर्तन सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सागरभाऊ लोंढे यांनी केली आहे या अनाधिकृत बेकायदेशीर सुरू असलेल्या हॉटेलवर तात्काळ पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्र-2 यांच्याकडून त्वरित संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल न केल्यास संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे

संपादक:- विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!