Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

वाघोली पोलिसांची दमदार कारवाई; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे (प्रतिनिधी) : वाघोली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन सराईत आरोपींना वाघोली पोलिसांनी अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सोने-चांदीचे दागिने, दुचाकी आणि मोबाईलचा समावेश आहे.

वाघोली पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व पोलीस अंमलदार दिपक कोकरे यांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी वाघोली परिसरातील काळे ओढा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहित हनुमंत राठोड (वय ३२) आणि मनोज आनंद गायकवाड (वय २४) यांचा समावेश असून दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून ५.६ ग्रॅम सोने, ७५.६२ ग्रॅम चांदी, एक दुचाकी व तीन मोबाईल असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे वाघोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमनाथ मुंढे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुशाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल रसतापे आणि गहिनीनाथ बोचणे यांनी सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.

संपादक:- विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!