Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

धक्कादायक घटना : पुण्यात डॉक्टरांचे अपहरण, १९ लाख रुपयांची खंडणी वसूल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
 पुणे लोणी काळभोर (प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील ऊरळी कांचन परिसरात कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारी घटना समोर आली आहे. डॉक्टर, त्यांचा चालक आणि महिला मदतनीस यांचे अपहरण करून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत.
🔹 घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५८ वर्षीय डॉक्टर असून ऊरळी कांचन भागात त्यांचा दवाखाना आहे. १० जानेवारी रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास डॉक्टर, चालक आणि महिला मदतनीस मोटारीतून जात असताना प्रयागधाम रस्त्यावर पाच जणांनी त्यांची गाडी अडवली.
🔹 शस्त्रांचा धाक, अमानुष मारहाण
आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवत डॉक्टरांवर हल्ला केला. मारहाण करताना एका आरोपीने डॉक्टरांच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तिघांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देत डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
🔹 २० लाखांची मागणी, १९ लाखांची वसुली
आरोपींनी तिघांना डांबून ठेवत २० लाख रुपयांची खंडणी मागितली. भीतीच्या वातावरणात डॉक्टरांकडून १९ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. खंडणी मिळाल्यानंतर आरोपींनी तिघांची सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला.
🔹 पोलीस तपास सुरू, आरोपींचा शोध
घटनेनंतर डॉक्टरांनी ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अपहरण, खंडणी आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे तपास करत असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
🟥 दिपसागर न्यूजचा सवाल :
भरवस्तीत डॉक्टरांचे अपहरण होऊन कोट्यवधींची खंडणी उकळली जाते, तर नागरिकांची सुरक्षा नेमकी कुठे आहे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!