Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

जय भगवान विधी महाविद्यालयाचा ऐतिहासिक निकाल – एल.एल.एम. पहिल्या तुकडीचे १००% यश

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

ठाणे ( विठावा) प्रतिनिधी – विधी शिक्षण क्षेत्रात वेगाने आपले स्थान निर्माण करणाऱ्या जय भगवान विधी महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. महाविद्यालयाच्या एल.एल.एम.च्या पहिल्याच तुकडीने तब्बल १०० टक्के निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या दैदिप्यमान यशामागे संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक व ज्येष्ठ कायदे तज्ञ डॉ. भगवान केणी सर यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची कटिबद्ध भूमिका ठळकपणे अधोरेखित होते. विधी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक दृष्टीकोनामुळे महाविद्यालय अल्पावधीतच विश्वासार्ह नाव म्हणून पुढे आले आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यापुरते न राहता उच्च श्रेणीत गुण संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. अनुभवी प्राध्यापक वर्गाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियोजनबद्ध अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हा शंभर टक्के निकाल शक्य झाला आहे.
महाविद्यालयात नियमित मूट कोर्ट सराव, कायदे विषयक कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तसेच व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कायदेशीर समज आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ठाणे परिसरातील विधी शिक्षण क्षेत्रात जय भगवान विधी महाविद्यालय हे गुणवत्तेचे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत असल्याचे शिक्षण क्षेत्रातून मत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!