Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 : सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुकीत मोठे बदल  19 जानेवारीला पुणे शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे शहर (प्रतिनिधी)
पुणे शहरात 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026’ मुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील प्रमुख भागांमधील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
वाहतूक बदलांची माहिती
19 जानेवारी रोजी पुणे शहरात सायकल रॅली पार पडणार असून, जंगली महाराज रोड व फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत (८ तास) पूर्णपणे बंद राहणार आहे.या पार्श्वभूमीवर: शाळांना सुट्टी देण्यात आली आहे कार्यालयांनी शक्य असल्यास सुट्टी द्यावी अन्यथा मेट्रो व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे
बजाज पुणे ग्रँड टूर 2026 – आंतरराष्ट्रीय क्रीडा वारसा
बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा नसून, पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा क्रीडा व पायाभूत वारसा ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यात आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ,सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग उपस्थित होते.
पुणे जिल्हा आंतरराष्ट्रीय नकाशावर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग व आयटी क्षेत्राची जोड असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य या स्पर्धेला वेगळेच वैशिष्ट्य देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, यामुळे पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळकपणे ओळखला जाईल.
437 किमी रस्त्यांचा जागतिक दर्जाचा विकास
या स्पर्धेसाठी ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आले आहेत. रस्त्यांसह आवश्यक सर्व सुविधा उभारण्यात आल्या असून, अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयारी पूर्ण करणे हे प्रशासनाचे उल्लेखनीय यश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

महाराष्ट्र शासनाचे पूर्ण सहकार्य
‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी सर्व सायकलपटूंना खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले. जगभरातील 35 हून अधिक देशांतील आंतरराष्ट्रीय सायकलपटू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करत, पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!