Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

रिपब्लिकन वाहतूक सेना पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने इफ्तार पार्टी; त्रिशाला बुद्ध विहारात सामाजिक सलोख्याची हाक

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे शहर (प्रतिनिधी): रिपब्लिकन वाहतूक सेना पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने त्रिशाला बुद्ध विहार, कृष्णा नगर, पुणे येथे इफ्तार रोजा पार्टीचे अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विविध समाजघटकातील नागरिकांनी एकत्र येत रमजानच्या पवित्र महिन्यात मानवता, त्याग, संयम आणि बंधुतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.
या प्रसंगी जमाते इस्लामी हिंद कॅम्प, पुणे या संस्थेच्या वतीने मा. कमरुद्दीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रोजा सोडल्यानंतर इस्लाम धर्मातील मूल्ये, रमजान महिन्याचे अध्यात्मिक महत्व, तसेच समाजात प्रेम, शांतता आणि परस्पर सन्मान जपण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. रमजान हा केवळ उपवासाचा नव्हे तर आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास बाळासाहेब हजारे (पुणे शहराध्यक्ष), सतीश साबळे (जिल्हाध्यक्ष), अजय साळवे (कार्याध्यक्ष), सोमनाथ लोंढे, दिनेश पवार यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभाग घेत आपुलकी, स्नेह आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ केली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भारतीय संविधान आणि कुराण यांचे प्रतीकात्मक आदानप्रदान करण्यात आले. या अनोख्या उपक्रमातून सर्वधर्मसमभाव, विचारांची देवाणघेवाण आणि सामाजिक सलोख्याचा प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!